शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने केली श्रम व पैसा वाचवणारी गांडूळ खत चाळणीची निर्मिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:28 PM

संगमनेर येथील भाऊसाहेब लहानू बोऱ्हाडे या शेतकऱ्याने गांडूळ खत आणि वाळू चाळण्यासाठी अगदी कमी खर्चात चाळणी तयार केली आहे.

- यमन पुलाटे  (लोणी, जि.अहमदनगर)

अहमदनगर जिल्ह्यातील छोटेशे गाव असलेले खळी तालुका संगमनेर येथील भाऊसाहेब लहानू बोऱ्हाडे या शेतकऱ्याने गांडूळ खत आणि वाळू चाळण्यासाठी अगदी कमी खर्चात चाळणी तयार केली आहे. या चाळणीमुळे गांडूळ खत उत्पादन प्रकल्पासह बांधकाम व्यावसायिकांच्या श्रम व खर्चात मोठी बचत झाली आहे. 

भाऊसाहेब बोऱ्हाडे यांनी बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न करता शेती व्यवसाय व खळी येथे पंक्चरचे दुकान सुरू केले. या दुकानासोबतच शेतकऱ्यांची गरज म्हणून शेती अवजारे दुरुस्ती करता करता त्यांनी आवड म्हणून वेल्डिंग व्यवसाय सुरू केला. यानंतर बुद्धिकौशल्य वापरून त्यांनी लिंबू बागेतील मशागतीची अवजारे तयार केली. सेंद्रिय शेतीची आवड असल्याने गांडूळ खत प्रकल्प ही केला; पण या खतातून काडी-कचरा, दगड-माती कशी वेगळी करणार ? हा प्रश्न होता. 

यासाठी सुरुवातीला त्यांनी वाळू चाळणीचा प्रयोग केला; पण तो जरा त्रासदायक वाटला. म्हणून त्यांनी काहीतरी तरी वेगळे करीत लंबगोलाकार आकार देत गजाचा वापर करीत त्याला चाळणी लावून केवळ १०० ते १५० किलो वजनाची ही चाळणी तयार केली. कमी खर्चात ही चाळणी तयार केली असून याद्वारे दोन व्यक्तींना दररोज सरासरी चार टन गांडूळ खत चाळता येते. शिवाय कचरा दगड-माती आणि गांडूळ वेगळे होऊन तयार गांडूळ खत भाऊसाहेब थेट गोणीमध्ये साठवून ठेवतात. 

गांडूळ खताबरोबर त्याचा उपयोग वाळू चाळण्यासाठीही केला जातो. चाळणीची साईज बदलून धान्य चाळता देखील येऊ शकते. अगदी कमी श्रमात या चाळणीद्वारे काम होत आहे. ही चाळणी त्यांनी शेतकऱ्यांना देण्याबरोबरच भाडेतत्त्वावर देखील उपलब्ध करून दिली आहे.  ही चाळणी मशीन विद्युत मोटारीवर चालत असल्याने वेळ व श्रम याची मोठ्या प्रमाणावर बचत होते.