कारखाना विश्रामगृहात शनिवारी (दि. २९) २२ कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री थोरात बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक, यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात, शिवाजीराव थोरात, जिल्हा परिषद सदस्य आर.एम. कातोरे, चंद्रकांत कडलग, इंद्रजित खेमनर, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, अभिजित ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिकराव यादव, रामदास वाघ, संभाजीराव वाकचौरे, भास्करराव आरोटे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीरा वर्पे, मंदा वाघ, अमृतवाहिनी बँकेचे उपाध्यक्ष दत्तू खुळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, शंकर ढमक, भाऊसाहेब खर्डे, अॅड. शरद गुंजाळ, केशव दिघे, राजेंद्र कढणे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. यावर्षी विक्रमी १३ लाख १९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना वेळेत पगार, विविध सुविधा व बोनस दिले आहेत. कारखान्याचे उपाध्यक्ष हासे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी आभार मानले.