टाकळी ढोकेश्वर : जीएस महानगर बँकेला आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ६१ कोटी ८३ लाख इतका ढोबळ नफा झाला असून, निव्वळ नफा २५ कोटी १९ लाख रुपये आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संस्थेच्या ठेवींमध्ये आर्थिक वर्षात चांगली वाढ झाली. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांच्या माध्यमातून दोन हजार ६९९ कोटी ७८ लाखांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून, व्यवसाय चार हजार ३९८ कोटी ५३ लाखांचा, तर कर्ज वाटप एक हजार ६९२ कोटी ९ लाख रुपये आहे. राखीव निधी ३४३ कोटी ७१ लाख इतका आहे. खेळते भांडवल तीन हजार १७० कोटी ५६ लाख रुपये आहे. गुंतवणूक एक हजार २१४ कोटी ७२ लाख रुपये असून, थकबाकी व एनपीएचे प्रमाण अत्यल्प राखण्यात यश आल्याचे शेळके यांनी सांगितले.
शेळके म्हणाले, बँकेची आर्थिक घडी चांगली असून, बँकेला कुठलाही धोका नाही. देशात बँकिंग क्षेत्रात जो बदल झाला, त्याला सामोरे गेले पाहिजे, तरच आपण स्पर्धेत टिकणार आहोत. बँक सक्षम राहण्यासाठी चांगल्या कर्जदारांची गरज असून, बुडीत कर्जाची वसुली करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. स्व. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचा आदर्श जपत सर्वांना बरोबर घेऊन बँकेचा कारभार चांगल्या प्रकारे करत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
--
१२ उदय शेळके