अहमदनगर : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व विविध प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली.आंदोलनात नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, ग्रामीण अध्यक्ष शरद दळवी, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौघुले, राजश्री धात्रक, अनिता सरोदे, सुनील सुसरे, विठ्ठल ढगे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, विलास पेद्राम, रावसाहेब निमसे, सखाराम गरुडकर, अनिल आचार्य, अरविंद आचार्य, निलेश बांगर, नितीन म्हस्के, पी. एस. सुरकुटला, सुनीता जामगावकर, ताजमहंमद शेख आदींसह शिक्षक सहभागी झाले होते.परिभाषित अंशदायी पेन्शन योजना बंद करुन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. केंद्रीय कर्मचा-यांप्रमाणे दि. १ जानेवारी २०१६ पासून राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना मेडिकल कॅशलेस योजना सुरू करावी. शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंद लागू करावा. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची भरती सुरू करावी, विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुदान मिळावे, शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेला कंपनी कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली.
शिक्षकांचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 8:34 PM