पालकमंत्री राम शिंदे गुंडांना पोसण्याचे काम करत आहेत - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:34 PM2018-05-02T20:34:09+5:302018-05-02T20:39:32+5:30
नगर जिल्ह्यात महीनाभरात दोन हत्याकांड झाले. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जामखेड येथे गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असून पैलवानच्या नावाखाली फ्लेक्स लावून मुले गोळा करून चो-या करणे, कर्जवसुली, जमीन बळकावणे, अवैध सावकारकी असे उद्योग केले जात आहेत. येथील लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात असून त्यांना हे बंद करावसे का वाटत नाही? या दहशतवादाला राजाश्रय मिळत असून गुंडाना पोसण्याचे काम पालकमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जामखेड - नगर जिल्ह्यात महीनाभरात दोन हत्याकांड झाले. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जामखेड येथे गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असून पैलवानच्या नावाखाली फ्लेक्स लावून मुले गोळा करून चो-या करणे, कर्जवसुली, जमीन बळकावणे, अवैध सावकारकी असे उद्योग केले जात आहेत. येथील लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात असून त्यांना हे बंद करावसे का वाटत नाही? या दहशतवादाला राजाश्रय मिळत असून गुंडांना पोसण्याचे काम पालकमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पवार यांनी आज जामखेड हत्याकांडातील मयत युवक योगेश व राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. या दोन्ही कुटुंबीयांनी मुख्य आरोपीला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेचा मास्टरमाईंड जोपर्यंत सापडत नाही, त्यांना फाशी होत नाही. तोपर्यंत आम्ही या कुटुंबीयांच्या राष्ट्रवादी पक्ष पाठीमागे राहू. पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी. पोलीस जर कमी पडत असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटून एसआयटी किंवा सीआयडी मार्फत चौकशी करावी. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. या सर्व घटनेच्या पाश्र्वभूमीवर येत्या अधिवेशनात आवाज उठविणार आहोत.
या दोन्ही राळेभात कुटुंबाची माहीती घेऊन हे कुटुंब सर्वसामान्य असून या कुटुंबाचे पुनर्वसन कशा प्रकारे करता येईल यासाठी आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.मधूकर राळेभात, राजेंद्र कोठारी, डॉ. भास्करराव मोरे, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात व अमित जाधव उपस्थित होते.