जिल्हा व सत्र न्यायाधीश भोसले यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वकील होण्यासाठी मसुदा, दावा आणि कैफियत यांच्या रचनेचे आणि मांडणीचे महत्त्व सांगितले. दुसऱ्या सत्रात न्यायाधीश पी. डी. कोळेकर यांनी उच्च न्यायालयाच्या अनेक खटल्यांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप मालपाणी यांनी ग्रामीण न्यायालयांतील कामकाजाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत गोंगे यांनी वकिली व्यवसायात आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे विवेचन केले, तर महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख सचिव संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शेवटच्या सत्रात ज्येष्ठ विधिज्ञ रंजना गवांदे यांनी मसुदा, दावा आणि कैफियतमध्ये संक्षिप्त लिखाणाचे महत्त्व यावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. राहुल देशमुख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पठारे यांनी केले. प्रा. देवयानी निकम यांनी आभार मानले.