अहमदनगर: शहरात तलवारीने खुन केल्याची घटना ताजी असतानाच नगर- भिंगार रस्त्यावरील भिंगारनाला परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवार, गुप्ती आणि दहा सुरे जप्त केले आहेत. याप्रकरणी मुंकूंदनगर परिसरात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नगर- भिंगार रस्त्यावरील भिंगारनाला एक इसम बेकायदेशीर हत्यारे घेऊन येणार आहे, अशी माहिती गुप्त बातमीदारामात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्याअधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर- भिंगार रस्त्यावरील भिंगारनाला येथे सापळला लावला. त्यावेळी जवळच असलेल्या काटवनातून सहा इसम संशयिरित्या येताना आढळले. यापैकी एकाच्या हातात काळ्या रंगाची बँग, तर दुसऱ्याच्या हातात पांढऱ्या रंगाची गोणी होती.
पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता एक तलवार, एक गुप्ती, दहा सुरे, असा एकूण ८ हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साबीर अस्लम सय्यद (१९) समी मुजीब शेख ( १९) , अजहर गफ्फर शेख ( २०, सर्व राहणार मुकूंदनगर, नगर ) अशा तिघा आरोपीसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, मनोहर गोसावी, पाेलीस नाईक रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने केली.