शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या पुण्यनगरीत कर वसुलीसाठी चक्क गुंडगिरी करून चहाची टपरी चालवणाºयास बेदम मारहाण केल्याचे बुधवारी समोर आले आहे. या संदर्भातील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.कर वसुली करणारे कर्मचारी आणि सोबत असलेल्या गुंडाने हातगाडीवर चहा विकणाºया इसमाला बेदम मारहाण आणि अर्वाच्च शिवीगाळ करताना दृष्यात दिसत आहे. शिर्डी नगरपंचायतीने खासगी ठेकेदारास फेरीवाले तसेच फुटपाथवर बसलेल्या छोट्या व्यावसायिकांकडून कर वसुलीचा ठेका दिला आहे. ठेकेदाराचे कर्मचारी पावती न देता जबरदस्तीने कर वसुली करीतआहेत.रस्त्यावर लागणाºया बसेसमध्येही शिरूनही दादागिरी करून वसुली करण्यात येत असल्याची बाबही समोर आली आहे़ कर वसुलीसाठी अशा प्रकारे मारहाण केल्याने या कर्मचाºयांवर नगरपंचायत प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत नगराध्यक्षा योगिता अभय शेळके यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे़ या घटनेत ठेकेदाराची चूक असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल़ मात्र ठेकेदाराला अंधारात ठेवून वसुली करणारे परस्पर उद्योग करीत असतील तर त्याची शहानिशा करून त्याबाबतही योग्य ती कारवाई करण्यात येईल.
साईनगरीत कर वसुलीसाठी गुंडगिरी : टपरी चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:24 PM