अहमदनगर : नारीशक्ती पुरस्कारासारखे उपक्रम राबवून गुरुकुलने महिलांचा सन्मान वाढवला. नंतर इतर मंडळांनीही असे उपक्रम सुरू केले. कुणी चांगल्या गोष्टीचे अनुकरण केले तर त्यात आपले यश दडलेले असते, असे साहित्यिक व शिक्षकनेते संजय कळमकर यांनी सांगितले.
शिक्षिकांनी सुरू केलेल्या सावित्रीच्या लेकी या मासिकाचे प्रकाशन कळमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मीना निकम, कल्पना बावीस्कर, जयश्री घोडेकर, शैला घाडगे, कमरूनिसा शेख, सुनीता मोरे, सुलोचना कुळधरण, शहा आरजू कौसर, कल्पना खरोटे, शिल्पा घोलप, सुनीता मगर, स्वाती मुत्रक, पुष्पलता साळी, राजश्री वखरे, सुनीता क्षीरसागर, सुनंदा राहिंज आदी उपस्थित होत्या.
कळमकर म्हणाले, महिलांनी व्यक्त झाले पाहिजे. वेदना प्रकटीकरणाला व भावनाविष्काराला लेखनाइतके चांगले माध्यम नाही. सावित्रीच्या लेकी मासिकाने शिक्षिकांना अशी संधी प्राप्त करून दिली आहे.
...............
महिलांच्या मदतीला गुरुकुल
जेथे महिलांवर अन्याय होतो तेथे गुरुकुल मदतीला येते. मंडळाचे सारेच उपक्रम आम्हाला आवडतात. गुरुकुलने दरवर्षी नारीशक्ती पुरस्कार देवून आम्हाला समाजात वेगळे स्थान प्राप्त करून दिले आहे, असे मनोगत राहाता येथील शिक्षिका सुनीता क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
........
२५ संजय कळमकर