श्रीरामपूर : शहर व तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. पोलीस विभागाकडूून कार्यवाही होत नसली तरी अन्न व औषध प्रशासन मात्र छापे टाकत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता बेलापूर-पढेगाव रस्त्यावर एका वाहनातून विभागाने साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त के.जी.गोरे, प्रसाद कसबेकर, सुरक्षा अधिकारी विष्णु मुळे, पंच शकुर शेख आदींच्या पथकाने पिकअप वाहनाचा (एमएच १८ एए ६४५०) पाठलाग करत ते अडविले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अधिकाºयांना संशय आला.
गाडीतून ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा पान मसाला व ९० हजार रुपयांची तंबाखू असा एकूण ४ लाख ५० हजाराचा गुटखा मिळून आला. चालक मदन विजय कणगरे (रा.नवीन घरकुल, गोंधवणी रोड ) याच्याविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी विष्णु मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.