सुपा : आ. निलेश लंके यांचे गाव असलेल्या पारनेर तालुक्यातील हंगा ग्रामपंचायतीची निवडणूक ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिनविरोध केली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना अर्ज दाखल केलेल्या विरोधकांनी लंके यांच्याशी चर्चा करून बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी दर्शविली. बिनविरोध निवडीमध्ये एकही जागा न घेता विरोधकांनी मनाचा मोठेपणा दाखविला.
‘हंगा तिथे दंगा’ अशी हेटाळणी करून तालुक्यातील अधिकारी तसेच राजकीय पुढाऱ्यांकडूनही हंग्याच्या नागरिकांना वेगळी वागणूक दिली जायची. २०१० मध्ये गावातील ५० टक्के तंटे एकत्र बसून मिटविले. काही न्यायालयात मिटविले. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ग्रामस्थांनीच एकत्र बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रामस्थांचे आहे, माझे नाही. सर्वांनी राग, लोभ विसरून एकत्र येत मतभेदांना तिलांजली दिल्याने आता हंगे गाव नव्हे, तर परिवार म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास आ. निलेश लंके यांनी व्यक्त केला.
यावेळी डी. के. नगरे, प्रा. दत्तात्रेय दळवी, कारभारी नगरे, नंदू शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाबू नवले, मारूती हरी शिंदे, धोंडीभाऊ नगरे, रमेश ठोंबरे, रमेश दळवी, बाळासाहेब लंके, विष्णूपंत नगरे, प्रा. रामदास शिंदे, प्रा. आबासाहेब दळवी, युवराज दळवी, चंद्रकांत मोढवे, अनिल सूर्यवंशी, भाउसाहेब साठे, सुहास नगरे, राजू शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो : ०६ हंगा
हंगा येथे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.