अहमदनगर : जिल्ह्यातील नऊशेहून अधिक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती चालू वर्षात हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४१ ग्रामपंचायतींची तपासणी गटविकास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे पथकाला दाखविण्यासाठी गावातील स्वच्छता शौचालयांचे नीटनेटके ठेवण्याची धावपळ सुरू आहे.सन २०१४ मध्ये शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. नगर जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात १ हजार ३११ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ९२३ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित झाल्या आहेत. चालू वर्षात उर्वरित ३८८ ग्रामपंचायतींची तपासणी मध्यंतरी राज्यस्तरीय समितीकडून करण्यात आली आहे. गावातील वैयक्तिक, सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छता आदींची पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पथकाने सदर ग्रामपंचायती हागणदारी मुक्तीसाठी पात्र ठरविल्या आहेत. त्यापैकी १० टक्के ग्रामपंचायतींची गटविकास अधिका-यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करण्यासाठी अन्य तालुक्यातील पथकाची नेमणूक जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे़ गटविकास अधिकाºयांच्या तपासणीनंतर जिल्हा परिषदेकडून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे गटविकास अधिकाºयांची तपासणी महत्वाची आहे. तपासणीबाबतची माहिती ग्रामसेवकांना कळविण्यात आली आहे. त्यामुळे गावोगावी वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, परिसर स्वच्छतेची तयारी गावक-यांकडून सुरू आहे. सदर गावांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून, तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायती तपासणी सुरूअकोले- गर्दनी, मन्याळे, शिरपंजे बु, देवठाण, समशेरपूरजामखेड-चौंडी, वाकी, सावरगाव, गुरेवाडीकर्जत-जळगाव बजरंगवाडी, वडगाव तनपुर, बारडगाव सुद्रीकसंगमनेर-खरे, तिगाव, झोळे,कोपरगाव-कन्हेगाव,वेस, वारीश्रीरामपूर-हरेगावनेवासा-माका, माळीचिंचोरा, खरवडी, पाचेगाव,शेवगाव-कुरूडगाव, आंतरवाली, घोटणपाथर्डी-कोरडगाव, डोंगरवाडी, पिरेवाडी, जोगेवाडी, चिंचपूर इजदे, मुंगसेवेढे, मिडसांगवी,श्रीगोंदा- आनंदवाडी, शेडगाव, वांगदरीनगर-रांजणी, बहिरवाडी, माथनी, इमामपूर
जिल्ह्यातील ४१ ग्रामपंचायतींत तपासणीची धामधूम : हागणदारीमुक्त अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:42 AM