शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हिवरेबाजारने केलेले ग्रामविकासाचे काम अदभुत : डॉ.अंजली तेंडुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:33 PM

आदर्शगाव हिवरे बाजारने पाणी नियोजनातून केलेली कृषीकांती देशाला मार्गदर्शक ठरेल असे मत डॉ.अंजली सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केली. तेंडुलकर यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गेली २८ वर्षे लोकसभागातून झालेल्या विविध कामांची पहाणी करून माहिती घेतली.

ठळक मुद्देहिवरेबाजारला भेट

अहमदनगर : आदर्शगाव हिवरे बाजारने पाणी नियोजनातून केलेली कृषीकांती देशाला मार्गदर्शक ठरेल असे मत डॉ.अंजली सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केली. तेंडुलकर यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गेली २८ वर्षे लोकसभागातून झालेल्या विविध कामांची पहाणी करून माहिती घेतली.तेंडुलकर म्हणाल्या, हिवरे बाजारने पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले ग्रामविकासाचे काम अदभूत आहे. प्रत्येक शेतक-याच्या बांधापर्यंत योजनांचे जाळे या गावाने निर्माण केले आहे. ठराविक काळासाठी व विशिष्ठ कामासाठी गावाला एकत्र आणणे व काम करणे कदाचित सोपे आहे परंतु संघटनात्मक कामातील सातत्य हे या गावाचे खरे वैशिष्ठ्य आहे. सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतलेल्या उस्मानाबाद जिल्यातील डोणजे गावात सुध्दा पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले असून तेथे काम करण्यास वेगळी दिशा मिळाली आहे. तेंडुलकर फौंडेशन वतीने करंजी (ता.पाथर्डी) व कोकणात काही गावात ग्रामविकासाचे काम चालू आहे. त्यासाठी पोपटराव पवार यांच्या अनुभवाचा फायदा घेवून काम करण्यास निश्चित आनंद होईल.गावागावातील मतभेद दूर करण्यासाठी व संघटन मजबूत करून इतर गावांमध्ये पोपटरावांच्या मदतीने प्रत्येक गोष्ट शेतक-यांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.कालच्या भेटीत डॉ.अंजली तेंडूलकर समवेत मृण्मय मुखर्जी व झोया कजरी उपस्थित होते. पोपटराव पवार यांनी विविध विकास कामांची माहिती देताना पुढील काळात विकासात्मक कामात सहकार्य करण्याचे सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnjali Tendulkarअंजली तेंडुलकर