शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 4:52 PM

अहमदनगर : सध्याच्या काळात हृदयविकाराचीे अनेक कारण आहेत.  उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, अनुवंशिकता, टाइप ए पर्सनॅलिटी, तणाव, चिंता, नैराश्य, व्यायामाचा अभाव ही कारणे आहेत. धावपळीच्या युगात तरुण आणि वृध्दांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना केल्या तर हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो, असे मत हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुदाम जरे यांनी व्यक्त केले.

जागतिक हृदय आरोग्य दिन विशेष

हृदयविकार म्हणजे काय?

हृदयाला प्राणवायुमुक्त रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांना धमणी म्हणतात. (करोनरी आरटरी) मनुष्याचे वय जसे वाढते व ज्यांना कार्डियॅक रिस्क फॅक्टर आहेत. त्यांच्या हृदयाच्या धमणीमध्ये चरबीचा थर जमा होतो. (अ‍ॅथरोक्सिरॉसीस) त्यामुळे धमणी चिंचोळी होते व हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. ह्या चरबीच्या थराला जखम झाल्यास रक्ताची गुठळी तयार होते. हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. हृदयाचे स्नायू मृत पावतात व हृदयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात.

रिस्क फॅक्टर काय आहे? उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, अनुवंशिकता, टाइप ए पर्सनॅलिटी, तणाव, चिंता, नैराश्य, व्यायामाचा अभाव.

हृदयविकाराची लक्षणे कोणती आहेत?हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला छातीत आणि पाठीत कळ येऊन ती डावा खांदा, हात व मानेकडे जाते. पूर्ण शरीराला दरदरून घाम फुटतो. मळमळ व उलटी होते. काही जणांना गळा आवळल्यासारखे वाटते. श्वास घेण्यास त्रास होतो. काही जण चक्कर येऊन बेशुद्ध होतात. उपचार - ५० टक्के मृत्यू हे रुग्णालयात पोहचण्यापूर्वी होतात. ई.सी.जी. व टु डी इको केल्यानंतर पुढच्या उपचाराचा निर्णय घेतला जातो. अ‍ॅस्पिरिनची गोळी दिली जाते. 

आधुनिक उपचार पध्दती कोणती? प्रायमरी अ‍ॅन्जिओप्लास्टी : रुग्णाला कॅथलॅब सूट मध्ये घेऊन हाताच्या किंवा पायाच्या शिरेतून कॅथेटरच्या सहाय्याने हृदयाच्या धमणीमध्ये डाय (कॉन्ट्रास्ट) सोडले जाते व फोटो काढतात. (करोनरी अ‍ॅन्जिओग्राफी) धमणीतील रक्ताच्या गुठळ्या काढून तिथे स्टेंट बसवतात. (करोनरी अ‍ॅन्जिओप्लास्टी) व हृदयाचा खंडित झालेला रक्तपुरवठा सुरळीत चालू होतो. जे रूग्ण दूर आहेत. व ज्यांना ९० मिनिटांमध्ये कॅथ लॅबपर्यंत पोहचणे अशक्य आहे त्यांना रक्ताची गुठळी वितळण्याचे इंजेक्शन दिले जाते (थ्रंबोलिमीस)

हृदयविकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?जीवनशैलीत बदल : समतोल आहार घ्यावा. आहारात चरबी व मीठाचे प्रमाण कमी आणि फायबर व जटील कार्बोदके यांचे प्रमाण जास्त असावे. हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे खावीत. दररोज ३०-४० मिनिटे घाम येईपर्यंत शारीरिक व्यायाम करावा. (चालणे, पोहणे, सायकल चालवणे). मानसिक स्वास्थ्य स्थिर असावे. (योगा, मेडिटेशन) पोटाचा घेर कमी करावा. धूम्रपान करू नये व करत असल्यास बंद करावे. उच्च रक्तदाब, मधुमेह व उच्च कोलेस्टेटॉल असणाºयांनी नियमित तपासणी करून औषधे घ्यावीत.

-डॉ. सुदाम जरे, हृदयविकार तज्ज्ञ, डायरेक्टर कॅथ लॅब मॅककेअर हॉस्पिटल, सावेडी, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल