शनिवारी प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी चार वाजता जोरदार वारा सुटला व त्यानंतर देवदैठण, गव्हाणेवाडी, हिंगणी, सावंतवाडी, राजापूर फाटा व परिसरात अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणी वाहू लागले.
गणेश पाटील यांचा ४० फूट उंचीचा वाय-फाय टॉवर प्रचंड वाऱ्याने कोसळला. त्यामुळे ढवळगाव, पाडळी, येवती या गावातील वाय-फाय सेवा विस्कळीत होणार आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. गावठाणातील अंगणवाडीची छतावर ठेवलेली प्लॅस्टिक टाकी वाऱ्यामुळे खाली कोसळून नुकसान झाले. जोरदार पावसाने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच कुकडीचे पाणी यायला उशीर झाल्याने सुकलेल्या पिकांना यामुळे संजीवनी मिळाली आहे.
290521\img_20210529_172850.jpg
देवदैठण येथे वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला . (छायाचित्र -संदीप घावटे )