अहमदनगर : सोमवारी दुपारी ढगाळ वातावरण आणि नंतर जोरदार पाऊस झाला. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. शहरातील अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडली. सोमवारी दुपारी ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काळेकुट्ट ढग असल्याने दिवसाही अंधार पडला होता अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून पाणी वाहत होते. हा पाऊस नगर तालुक्यातही जोरदार होता. त्यामुळे सीना नदीलाही पूर आला.
|
अहमदनगर शहरात दुपारीच जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी झाडे पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 3:01 PM