शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

पूरग्रस्तांसाठी नगरमधून मदतीचा ओघ : ग्रामसेवकांची ३ कोेटींची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:59 AM

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़

अहमदनगर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू सोमवारी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़पहिल्या टप्प्यातील मदत पाठविण्यात येणार असून, मदतीचे आवाहन राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहे़कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्य भावनेने मदतीचा हात दिला आहे. सुमारे तीन कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतल्याची माहिती राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली़पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामसेवक युनियनने पत्र देऊन राज्यातील ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन देणार असल्याचे कळविले आहे़ त्यानुसार २२ हजार ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची विनंतीही युनियनने सरकारला केली आहे. ही मदत सुमारे ३ कोटी रुपये इतकी होत आहे़ देशाप्रती व समाजाप्रती संवेदना जागृत असलेला ग्रामसेवक संवर्ग कर्तव्यापलिकडे जाऊन योगदान देत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ढाकणे म्हणाले़गणेश मंडळांचे कार्यकर्ते धावले मदतीलामाजी नगरसेवक निखील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देऊ मदतीचा हात’ मोहीम हाती घेण्यात आली आहे़ प्रभाग क्रमांक २ मधील गणेश मंडळांनी रविवारी ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू केले़ तसेच मदत फेरी काढून मदत जमा केली़ यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी ब्लँकेट, जर्किन, लहान मुलांचे कपडे, औषधे, बाटली बंद पाण्याचे बॉक्स, संसार उपयोगी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा केले आहेत, अशी माहिती वारे यांनी दिली़ सोमवारी निर्मलनगर येथील गाडेकर चौकांसह अन्य ठिकाणीही मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून, पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी आपल्याकडील वस्तू जमा कराव्यात, असे आवाहन वारे यांनी केले आहे़शिवसेना पाठविणार ट्रकभर बाटलीबंद पाणी, औषधेशिवसेनेच्या वतीने शहरातून मदत फेरी काढण्यात आली होती़ तसेच सेनेच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते़ चितळे रस्त्यावरील शिवालयात ही मदत जमा केली जात आहे़ सध्या पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी व औषधांची आवश्यकता आहे़ एक ट्रकभर बाटलीबंद पाण्याचे बॉक्स सोमवारी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे़ पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी चितळे रस्त्यावरील शिवालयात संपर्क करावा, असे आवाहन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले़आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशनतर्फे मदत केंद्र सुरूकोल्हापूर, सोलापूर आणि सांगली, या जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशनच्या वतीने सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे रविवारी सकाळीच मदत केंद्र उभारण्यात आले होते़ या केंद्रावर दिवसभरात एक ट्रक साहित्य जमा झाले असून, बाटलीबंद पाण्याचे बॉक्स, औषधे, कपडे, अन्नधान्य, बिस्कीटस आदी साहित्य नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत़ असोसिएशनचे अध्यक्ष सलीम शेख, सचिव अदिनाथ दहीफळे, भूषण पांडे, अभिजित देवी, अन्वर शेख, जोएब खान, सचदेव पवार, अंकुश पालवे, प्रदीप तांदळे, प्रशांत आढाव, अशोक सातकर, मकरंद देशपांडे, अनिल मुरकुटे आदींनी नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले असून, प्रतिसाद मिळत आहे़राष्ट्रवादी पाठविणार मदतराष्ट्रवादीच्या वतीने शहरातून मदत फेरी काढण्यात आली होती़ तसेच त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते़ त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत़ आमदार संग्राम जगताप मित्रमंडळाकडे बाटलीबंद पाणी, कपडे, बिस्किटचे पुड्यांचे बॉक्स, औषधे, खाद्यपदार्थ आदी ट्रकभर साहित्य जमा झाले आहे़ ते सोमवारी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येईल. मदतकार्य सुरू राहणार असून, नागरिकांनी मदत करावी असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.पूरग्रस्तांसाठी सरसावले नवनागापूरचे नागरिकसांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील प्रा. स्नेहल निर्मळ यांनी शुक्रवारी नवनागापूर भागातील जय मल्हारनगरमध्ये मदत फेरी काढली. या मदतफेरीमध्ये नागरिकांकडे तांदूळ, कपडे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स आदी साहित्य देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० किलो पेक्षा जास्त तांदूळ, कपडे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स दिले. या मदतकार्यामध्ये प्रणल मेहेर, तेजस्वी गाढवे, प्रा. राज सरोदे यांनी सहभाग नोंदवला. ही मदत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्याकडे देण्यात आल्याचे प्रा. निर्मळ यांनी सांगितले.मदतीसाठी सरसावले हिंगणगावनगर तालुक्यातीलहिंगणगाव येथे हरिनाम सप्ताहात ह.भ.प.बबन महाराज खेडकर यांनी ग्रामस्थांना महाराष्ट्रातील सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनबाबत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तसेच यांच्या वाणीतून पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. कीर्तन सुरू असताना महाराजांनी देखील ग्रामस्थांना मदतीची हाक दिली. या हाकेला ओ देताच दिवसभरात चार लाख रुपये किमतीचे साहित्य जमा झाले. गावातील एक टेम्पो तसेच त्यांच्याबरोबर आठ ते दहा संयोजक मंडळी प्रत्यक्षात जाऊन या वस्तूंचे वाटप करणार आहेत. मदत गोळा करण्यासाठी गावचे सरपंच आबासाहेब सोनवणे, उपसरपंच बाळासाहेब ढगे, दिलीप झावरे, मुकुंद दुबे, मनोज सोनवणे, बाळासाहेब पानसरे, वैभव ताकपेरे, जानकु शिंदे, रावा सोनवणे, जयवंत सोनवणे, बबन सोनवणे, पोपट ढगे, अर्जुन अडसूळ, शिवदास त्रिंबके, निसार पठाण, एकनाथ झावरे, अर्जुन पादीर, दत्तु सोनवणे, दादाभाऊ सोनवणे, संजय झावरे, सीताराम लोंढे, ज्ञानदेव वाघमारे, बाबा सोनवणे गुरुजी,प् ाांडुरंग सोनवणे,विश्वनाथ सोनवणे, संभाजी कोल्हे, अंजु सोनवणे, संजय शिंदे, शरद सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, बजरंग सोनवणे, चंदू पानसरे, साहिल पठाण, मदन फलके, निलेश सोनवणे याच बरोबर महिला भगिनी माजी सरपंच स्मिता सोनवणे, विद्यमान उपसरपंच आशाबाई ढगे, सुनिता मोरे, सुवर्णा दुबे, वंदना कांबळे, सरस्वती अडसूळ, मनिषा सोनवणे, छाया कांबळे, ज्योती सोनवणे, माया शेळके, जया कांडेकर यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय