केडगाव : नगर तालुक्यातील पाच शासकीय कोविड केंद्रांना एक लाख रुपये किमतीची कोरोना उपचार उपयोगी औषधे व प्रतिबंधात्मक साहित्य प्राथमिक शिक्षकाने दिले. प्राथमिक शिक्षकांची मदत ही प्राणवायूसारखी अनमोल आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केले.
पंचायत समितीच्या सभापती सुरेखा संदीप गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व कोविड केंद्रांच्या संदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक आम्ही-अहमदनगर या ग्रुपच्या वतीने कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्यासाठी कार्यरत असलेले कोरोना योद्धे यांना प्रत्यक्ष मदत देण्याच्या उद्देशाने जि. प. च्या प्राथिमक शिक्षक मित्रमंडळाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून मदतनिधी उभारण्यात आला. त्यामधून पाचही कोविड केंद्रांना वस्तूरूपाने मदत देताना एक लाख रुपये किमतीचे साहित्य - सॅनिटायझर, ॲटोमेटीक हॅन्ड सॅनिटायझर मशीन, व्हेपोराईझ मशीन आणि कोरोना उपचारासाठी उपयुक्त औषधे उपसभापती डॉ. दिलीप पवार, पं. स. सदस्य गुलाबराव शिंदे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आले.
---
२८ नगर तालुका कोविड
नगर तालुक्यातील कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षक मित्रमंडळाच्या वतीने औषधे भेट देण्यात आली.