कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळावेत, यासाठी येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत हे कोविड सेंटर सुरू होत आहे.
यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी २५ खाटा, सॉ. ॲड. विकास पोटघन यांनी ५१ हजार रुपये, विद्याधाम प्रशालेतील इयत्ता १२ वी प्रथम बॅचकडून ५१ हजार, सतीश सुभाष वाघमारे यांनी ५० गाद्या व उशी, संदीप सोनलकर यांनी १० हजार रुपयांची अंडी, संदीप भवर, सतीश महादू कौठाळे यांनी प्रत्येकी ११ हजार, लक्ष्मीकांत दंडवते यांनी ५ फॅन, अमोल बाळासाहेब वाघमारे यांच्याकडून रुग्णांसाठी पाणी बाटल्या, संदीप काळे यांनी ५ हजार ५०० रुपये, सर्जेराव कौठाळे यांनी ५ हजार रुपये, अमोल गायकवाड, किशोर गायकवाड यांनी प्रत्येकी १५०० रुपये, अनिल जाधव यांनी रुग्णांसाठी दररोजचे चहापान तसेच गणेश बनकर व आप्पासाहेब गुंजाळ हे आचारी म्हणून सेवा देणार आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. बजरंग करंजुले, डॉ. विकास पाटील, डॉ. सूर्यकांत राऊत, डॉ. जालिंदर जासूद, डॉ. आरती पाटील हे खासगी डॉक्टर आरोग्य सेवा पुरवणार आहेत.
गावोगावचे हरिनाम सप्ताह, यात्रा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर होणारी खर्चाची बचत झालेली रक्कम कोविड सेंटरमधील रुग्णांना अन्नदान व इतर कामासाठी मदत करावी, असे आवाहन उद्योजक अतुल लोखंडे यांनी केले आहे.