श्रीगोंदा : तालुक्यातील मढेवडगाव येथील दिव्यांग उद्योजक अंबादास गायकवाड यांनी पुणे परिसरात हाॅटेल व्यवसायात नवे विश्व निर्माण केले आहे. त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत श्रीगोंद्यातील कोविड सेंटर व गोरगरीब कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले.
लाॅकडाऊन काळात अनेक जणांचे रोजगार गेले. व्यवसाय बंद पडले. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्वांचेच आर्थिक नियोजन बिघडले. अशावेळी उद्योजक अंबादास गायकवाड यांनी पुढे होऊन मढेवडगाव येथील दोनशे गोरगरीब कुटुंबांना किराणा वाटप केले.
गायकवाड यांनी कोळगाव, लोणी व्यंकनाथ, देवदैठण, लिंपणगाव येथील कोविड सेंटरला प्रत्येकी ११ हजारांची मदत केली. मढेवडगाव सोसायटी व संघर्ष फाउंडेशनच्या उपक्रमांसाठी २१ हजारांची मदत केली.
मढेवडगाव येथील भैरवनाथ कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी आठवड्यातून तीन दिवस भोजन, रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी मदत केली.
----
३१ मढेवडगाव
मढेवडगाव येथील कोविड सेंटरला मदत करताना उद्योजक अंबादास गायकवाड.