पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांनी कोरोना रुग्णांना योग्य उपचार झटपट मिळावेत यासाठी श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत हे कोविड सेंटर सुरू केले आहे.
या कोविड सेंटरसाठी विद्याधामचे शिक्षक संदीप घावटे, प्रशांत वाळुंज, अमोल कातोरे, राजेंद्र जगताप व सुनंदा शेळके यांनी ११ हजार रुपये, अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने औषधे, संदीप सोनलकर यांनी ११ हजार रुपयांची अंडी, दिलीप नरके यांच्याकडून मांसाहारी जेवण, दशरथ कळमकर यांच्याकडून दहा वाफेच्या मशीन व सॅनिटायझर, डॉ. राहुल खामकर यांच्याकडून १०० लीटर सॅनिटायझर, संतोष काळे व सचिन अलभर यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार, संदीप काळे ५५००, संतोष वाघमारे यांच्याकडून २५००, नीलेश वेताळ यांच्याकडून २२२२ रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. रुग्णांचे दररोजचे जेवण तयार करण्याचे काम आप्पासाहेब गुंजाळ करत आहेत.
कोविड सेंटरची सर्व व्यवस्था पाहण्याचे काम प्रतीक वाघमारे, सूरज मुळे, अजित वाघमारे, प्रमोद उबाळे, सचिन माने, इक्बाल शेख व इतर तरुण करत आहेत.