अहमदनगर : चाकण (जि. पुणे) येथील एका कंपनीतील कर्मचारी व गोरेगाव (ता. पारनेर) येथील मूळ रहिवासी असलेल्या राजेश नांगरे यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटरला आर्थिक मदत दिली.
गोरेगाव येथे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनीही कोविड सेंटर सुरू केले आहे. या दोन्ही कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी सहकार्य म्हणून नांगरे यांनी आर्थिक मदत दिली आहे. तसेच ठाकूर पिंपरी येथील अनाथ आश्रम, आदिवासी मुलांचे वसतिगृह, शेलपिंपळगाव येथील अनाथ आश्रम, पाबळ येथील मतिमंद मुलांची शाळा अशा विविध ठिकाणी नांगरे यांच्याकडून नियमित मदत दिली जात आहे. कोरोना काळातही पुण्यात राहून गावाकडची बांधिलकी जपत नांगरे यांनी कोविड सेंटरला आर्थिक मदत सुरू केली आहे.
............
फोटो : राजेश नांगरे