कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जाफा कंपनीने नुकतेच १५०० पीपीई किट व मास्क आरोग्य विभागाला दिले; तर नुकतेच ईपीटॉम उद्योगसमूहाचे संचालक व सुपा इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी ५००० मास्क व जाफाने २५० मास्क असे ५२५० मास्क अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. कॅरिअर मायडिया कंपनी वाघुंडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ३ वर्गखोल्या, वाघुंडे खुर्द येथील बाळानंद स्वामी विद्यालयास ४ वर्गखोल्या, तर भैरवनाथ विद्यालय, पळवे व प्राथमिक शाळा पळवे यांना प्रत्येकी एक स्वच्छतालय बांधून देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वॉटर कुलर, आरोग्य विभागासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक पंकज यादव व गौतम साबळे यांनी दिली.
जिल्हा पोलीस यंत्रणेला मास्क प्रदान करतेवेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सुपा इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत, ‘जाफा’चे प्रतिनिधी आकाश आल्हाट, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले उपस्थित होते.