अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला हैदराबाद येथे पकडण्यात नगर पोलिसांची मदत करणाऱ्या हैदराबाद येथील पोलीस पथकाचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व हैदराबाद येथील अप्पर पोलीस महासंचालक यांच्यावतीने गौरव करण्यात आला.
हैदराबाद येथे नगर पोलिसांनी पाच दिवस सर्च ऑपरेशन राबवून बोठे याला अटक केली होती. या काळात नगर पोलिसांनी हैदराबाद पोलीस दलातील वुमन सेफ्टी व ॲनालिसिस पथकाची मदत घेतली होती. या पथकात पोलीस निरीक्षक आर रवींद्र, उपनिरीक्षक पी. हरीश, पोलीस कर्मचारी यू. रवी, एम. मधू, जी. रवीकुमार, के. आर. संध्यारेखा, के. सुनीता, ची. सैदुल यांचा समावेश होता. या पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा हैदराबाद येथील अपर पोलीस महासंचालक स्वाती लाकरा व पोलीस उपमहानिरीक्षक श्रीमती सुमती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
फोटो -मेलवर आहे
ओळी-हैदराबाद येथे बाळ बोठे याला अटक करण्यात मदत करणाऱ्या पोलीस पथकाचा हैदराबाद येथील अपर पोलीस महासंचालक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.