शिर्डी : शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा सतर्क करण्यात आली आहे. वाहन तसेच प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर देशातील दिल्ली, मुंबईसह महत्वाची शहरांसह विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे़ त्याच पार्श्वभुमीवर साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळालाही अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वृत्ताला विमानतळ संचालक धिरेन भोसले यांनी दुजोरा दिला आहे. या विमानतळाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीसांची सुरक्षा आहे. काल पासून वाहनांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. विमानतळावरून दिल्ली, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, भोपाळ, बंगलोर व जयपूरसाठी सेवा सुरू आहे.
साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:49 PM