पारनेर : स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरणार असल्याचे त्यांनी अण्णांना सांगितले.
तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी महाजन यांनी अण्णांबरोबर तासभर चर्चा केली. अण्णांच्या मागणीनुसार समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असतील. सरकारच्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अण्णांची भेट घेणार आहेत.
अण्णांचे उद्यापासून उपोषण राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात शनिवारपासून उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.