अहमदनगर : दहावीच्या निकालात यंदा जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याने (९३.६५ टक्के) बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे श्रीरामपूर तालुका (८४.४२ टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला आहे. आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क््यांच्या पुढे आहे.शुक्रवारी दुपारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला. हा निकाल मागील वर्षीपेक्षा (९०.०९ टक्के ) किंचित जास्त असला तरी पुणे विभागात मागील वर्षीप्रमाणे नगर तिसऱ्या म्हणजे शेवटच्या स्थानी राहिले. मागील वर्षी आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क्यांचा पुढे होता. यंदाही श्रीगोंदा, पारनेर, नगर, शेवगाव, जामखेड, कर्जत, संगमनेर, कोपरगाव हे आठ तालुके ९० टकक्यांच्या आसपास राहिले. एकाही तालुक्याचा निकाल ९५च्या पुढे गेला नाही. याशिवाय पाथर्डी, अकोले, राहाता, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांचा निकाल ९०च्या खाली राहिला.पुणे विभागात सर्वाधिक (९५.०५ टक्के) निकाल पुरंदर (ता. पुणे) तालुक्याचा आहे. तर सर्वाधिक कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा (८४.४२ टक्के) आहे.तालुका टक्केश्रीगोंदा - ९३.६५पारनेर - ९३.२४नगर - ९२.८४शेवगाव - ९२.०५जामखेड - ९१.५८कर्जत - ९१.३८संगमनेर - ९०.२९कोपरगाव - ९०.०१पाथर्डी - ८९.९७अकोले - ८९.९४राहाता - ८९.३४नेवासा - ८६.८९राहुरी - ८६.८२श्रीरामपूर - ८४.४२