कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ७४.८६ टक्के, उक्कडगाव ८८.३१ टक्के, घारी ८५.९६ टक्के, रवंदे ८२.१५ टक्के, ओगदी ९०.४६ टक्के, अंचलगाव ८३.३९ टक्के, सोनारी ८६.१८ टक्के, हिंगणी ९१.३८ टक्के, वेळापूर ८१.६९ टक्के, देर्डे चांदवड ८५.७० टक्के, येसगाव ७९.७० टक्के, मढी बुद्रुक ८३.४४ टक्के, मढी खुर्द ८५.१७ टक्के, नाटेगाव ८८.४६ टक्के, कोळगाव थडी ८६.३७ टक्के, मळेगाव थडी ८७.५७ टक्के, मायगाव देवी ८९.४३ टक्के, मनेगाव ८९.४२ टक्के, काकडी ८८.६२ टक्के, जेऊर कुंभारी ८१.७२ टक्के, धोंडेवाडी ८८.०९ टक्के, अंजनापूर ८९.२९ टक्के, कोकमठाण ८३.४५ टक्के, कासली ८७.१४ टक्के, टाकळी ७८.७९ टक्के, जेऊर पाटोदा ७७.१० टक्के व सांगवी भुसार येथील ३ जागांसाठी ५५.६७ टक्के या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी एकूण ८२.२० टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ५३.०६ टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत ७०.२२ टक्के व शेवटी सायंकाळी साडेपाच पर्यंत ८२.२० टक्के मतदान झाले होते. तसेच २९ ग्रामपंचायतींच्या २७९ जागांपैकी सांगवी भुसार ६ व जेऊर कुंभारी १ अशा ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २७२ जागांसाठी ६११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचे राजकीय भवितव्य उद्या मतमोजणीनंतरच ठरणार आहे.
तिळवणी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक ९२.६४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:18 AM