अहमदनगर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रविवारी (दि.२२ मार्च) रोजी देशभरात जनता कर्फ्यू लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातून जाणाºया महामार्ग सकाळपासूनच ठप्प झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाल्याने सर्वत्र अभूतपूर्व शांतता होती.नगर शहरातून जाणारा नगर-पुणे महामार्गावर शनिवारी मुंबई, पुण्याकडून येणारे जथ्थे रविवारी सकाळी थांबले होते. शनिवारी दिवसभर पुण्याकडून मराठवाड्याकडे व नगरकडे येणाºयांची संख्या मोठी होती. ती आज थांबली होती. महामार्गावर अत्यावश्यक सेवेचे वाहतूक करणारे दुधाचे, रॉकेल, डिझेल, अन्नधान्यांची वाहतूक करणाºया चारचाकी वाहनांशिवाय कोणीही रस्त्यावर नव्हते. हुकून चुकून कोणी आले तरी त्यांची पोलीस चौकशी करीत होते. नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव, घोगरगाव, माहीजळगाव, रूईछत्तीसी येथे १०० बंद होता. यामुळे रस्त्यावर वाहने नसल्याने ढाबेही बंद होते. एरवी गजबजलेल्या नगर-मनमाड रस्ताही ओसाड होता. राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहाता, बाभळेश्वर येथे शुकशुकाट होता. नगर-औरंगाबाद रोडवरील घोडेगाव, नेवासा फाटा, प्रवरासंगम परिसरात सर्व हॉटेल, दुकाने बंद होती. नगर-कल्याण रोडवरील टाकळीढोकेश्वर येथे बंद होता. नगर-दौंड रस्त्यावरही शुकशुकाट होता. नगर-जामखेड, नगर-शेवगाव-पाथर्डी रोडवरही वर्दळ नव्हती. जनता कफ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे सर्व रस्ते निर्मनुष्य पहायला मिळाला. राहुरी येथे रस्त्यावर फिरणाºया पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले. कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नागरिकही त्यास हातात हात घालून कोरोनाशी लढा देत आहेत, असेच चित्र सध्या आहे.
महामार्ग ठप्प; रस्ते निर्मनुष्य, अभूतपूर्व शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:27 PM