पिंपळगाव माळवी : मागील महिनाभरापासून नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत ऊन आणि पाऊस यांची सांगड जमल्याने परिसरातील डोंगर हिरवेगार झाल्यामुळे पशुधनासाठी गावठी चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील बहुतांश शेतकऱ्यांकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय आहे. गेल्या एक महिन्यापासून ऊन व रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील टेंभी डोंगर, गोरक्षनाथ गड व केकताई परिसरातील डोंगर हिरवेगार झाले आहेत. सध्या पाऊस हलक्या स्वरूपात पडत असल्यामुळे गवत वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरही पशुधनासाठी चारा उपलब्ध होतो.
या परिसरातील बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध वाढीसाठी डोंगरातील हिरवा चारा अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे पुढील चार महिने पुरेल इतक्या प्रमाणात परिसरातील भटके व पाळीव जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार आहे.
-------
जनावरे मोकळ्या रानात चरल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या वनस्पती खाण्यास मिळतात. त्यामुळे दुग्ध उत्पादन वाढण्यास मदत होते. पशुधनाची प्रतिकारशक्ती वाढून शेतकऱ्यांचा चारा, पशुखाद्य यावरील खर्चदेखील कमी होतो.
-डॉ. अनिल कराळे,
पशुधन विकास अधिकारी
----
१६ पिंपळगाव माळवी
पिंपळगाव माळवी परिसरातील डोंगरावरील हिरावा चारा खाणारी जनावरे.
150921\2006img_20210913_174418.jpg
पिंपळगाव माळवी येथील डोंगर झाले हिरवेगार ;जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटली