तळेगाव दिघे : आपल्याकडे नाव कसं ठेवता येईल, याचाच कार्यक्रम दुर्दैवाने चालतो. काम करतो, त्याचे कौतुक केले पाहिजे. काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे लोहारे-सुतारमळा ते आडगाव रस्ता काम व सार्वजनिक वाचनालय कामाचा प्रारंभ थोरात यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, प्रभाकर कांदळकर, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन दिघे, पंचायत समिती सदस्य बेबी थोरात, विक्रम खांडरे, बाळासाहेब पोकळे, डॉ. संदीप पोकळे, अरुण पोकळे सहित पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, आपण प्रथम राज्यमंत्री झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. धरणाचे काम पूर्ण केले. कालव्यांची कामे लवकरच पूर्ण होऊन दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळेल. रस्त्यांची कामे चांगली करून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
.................
फोटो
लोहारे : येथे सुतारमळा ते आडगाव रस्ता कामाचा प्रारंभ करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, समवेत पदाधिकारी.