कर्जत : ग्रामीण डाक सेवकांना कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारसी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील कर्जत, राशीन, मिरजगाव येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन बेमुदत करण्याचा निर्णय कर्मचा-यांनी घेतला.टपाल कार्यालयाकडे आलेल्या पत्रांचे गावोगावी वाडी, वस्तीवर वाटप करण्याचे काम ग्रामीण डाकसेवक करतात. मात्र केंद्र सरकारने त्यांना कमलेश चंद्र कमिटीने सुचविलेल्या शिफारशी लागू केल्या नाहीत. म्हणून तालुक्यातील ग्रामीण डाकसेवक गुरुवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत नेटके यांनी दिली. आंदोलनात तालुक्यातील सर्व डाक सेवक सहभागी झाले आहेत. यामध्ये तात्या समुद्र, सुभाष अनारसे, संभाजी घालमे, संतोष काळे, संतोष गदादे, अशोक लाळगे, गोदड थोरात, महादेव घालमे, दशरथ काकडे, सर्फराज शेख, नवनाथ बिडगर आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्जत तालुक्यातील पोस्टमनने सुरू केलेल्या संपामुळे टपाल वाटप सेवा विस्कळीत झाली आहे.
कर्जतमध्ये टपाल कर्मचा-यांची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 7:30 PM