शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

लाडके जावईबापू 'लटकले', बाकी सगळे 'सटकले'; धुळवडीला गाढवावरून वाजतगाजत मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 11:21 AM

पिढ्यान् पिढ्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची खंडित पडलेली बारागाव नांदूर येथील परंपरा चार वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी : पिढ्यान् पिढ्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची खंडित पडलेली बारागाव नांदूर येथील परंपरा चार वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली. धूलिवंदनाचे औचित्य साधून बारागाव नांदूर येथील राजेंद्र कांदळकर या जावयाची वाजतगाजत गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. अन्य जावई दोन-तीन दिवसांपासून गावातून पळून गेले. यामुळे एकमेव कांदळकर यांची मिरवणूक काढली.

बारागाव नांदूर येथील रखमाजी वाघ यांचे जावई राजेंद्र कांदळकर हे बारागाव नांदूर येथे राहतात. कांदळकर यांना सापळा रचून मित्र व नातेवाइकांनी पकडले. त्यांच्या अंगावर रंगाची उधळन केली.बारागाव नांदूर परिसरात बँड पथकाच्या निनादात धिंड काढली. धिंड सासरे रखमाजी वाघ यांच्या घरी गेली. मुळा धरणाच्या पायथ्यापासून  मिरवणुकीस सुरुवात झाली. सासुरवाडीला जावयाला नवीन कपड्यासह पंचपक्वानाचे जेवण देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोनामुळे चार वर्षे जावयाची धिंड काढण्याची प्रथा बंद पडली होती. यंदाही जावयाची धिंड निघणार म्हणून बारागाव नांदूर परिसरातील इतर दावई हाती लागू शकले नाहीत.

कांदळकर यांना मित्र व नातलग रियाज इनामदार, राजेंद्र वाघ, लक्ष्मण वाघ, शरद वाघ, शिवाजी, भालेराव आदींनी पकडून मिरवणूक काढली.

५० वर्षांपासूनची प्रथा जपली

बारागाव नांदूर गावाने गेल्या ५० वर्षांपासून जावईबापूच्या धिंडीची प्रथा जपली आहे. कोरोना कालखंडात ही प्रथा बंद पडली होती. परंतु गावातील तरुणांनी प्रथा बंद पडू न देता वाघ यांचे जावई कांदळकर यांना अखेर शोधलेच.

मिरवणुकीचा मनात कुठलाच राग नाही. मित्रांनी नातलगांनी गाढवावरून मिरवणूक काढली. शेवटी वाघ कुटुंबीयांनी जावई म्हणून मला मान दिला.- राजेंद्र कांदळकर. जावई.

टॅग्स :Holiहोळी 2024