राहुरी - माऊंट आबो येथून राहुरी येथे परत आलेल्या तालूक्यातील सुमारे ३६ प्रवाशांना प्रशासनाने दिनांक १ मे रोजी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तसेच त्यांना १५ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून नागरीक भयभीत झाले आहेत.
सुमारे दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो नागरिक राजस्थान येथील माऊंट आबो येथे गेले होते. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील २९ नागरीक सामील होते. अचानक झालेल्या लाॅकडाऊनमुळे सर्व जण त्या ठिकाणी अडकून पडले होते. आज दिनांक १ मे रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान सदर सर्व नागरीक एस टी बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये परतले. त्या बरोबर राहुरी तालुक्यातील २९ जण आले आहेत. राहुरी येथील तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी सदर वाहने नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी बस स्थानक येथे थांबवली. त्यानंतर सर्व जणांची राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. ते सर्व जण बसून आलेल्या वाहनांना राहुरी नगरपरिषद कर्मचार्यांनी पूर्णपणे फवारणी करून सॅनिटायझर केले. तसेच काही जणांना अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. अशी माहिती समजली आहे.
मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत तहसीलदार फसिओद्दीन शेख हे सर्वच बारीक सारीक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. राहुरी तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये. यासाठी तहसीलदार फसिओद्दीन शेख हे आपल्या जिवाचं रान करीत आहे.