प्रास्ताविकात भाजप शहराध्यक्ष वसंत कदम म्हणाले, येत्या काळात भाजपच्यावतीने सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत. गणेशोत्सव काळात राबविलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत नागरिकांनी सहभाग नोंदविल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, गटनेते सचिन ढुस, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस, व्हाईस चेअरमन सुधीर टिक्कल, सोपान शेटे, शहाजी कदम, मच्छिंद्र कदम, दिलीप मुसमाडे, भारत शेटे, सुधाकर कदम, एकनाथ बनकर, फादर फ्रान्सिस विधाटे, रमेश मोरे, आझाद मित्रमंडळाचे संदीप कदम आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अनंतकुमार शेकोकर यांनी आयुर्वेद क्षेत्रात पीएचडी संपादन केल्याबद्दल तसेच अक्षय छाजेड यांनी सी. ए परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते डॉ. प्रवीण नामदेव पाखरे, द्वितीय क्रमांक प्रीती साळुंके, तृतीय क्रमांक पूनम गौतम भागवत, चतुर्थ क्रमांक सचिन उत्तमराव तनपुरे व पाचवा क्रमांक प्रणव प्रकाश पुंड यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.