घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथील शेतक-याकडून जादा आलेली रक्कम बोटा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिका-याने दोन दिवसांनी शेतक-याला परत केली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकलापूर येथील शेतकरी संजय साळवे यांना उसाचे पैसे मिळाले होते. पैशांची बचत व्हावी म्हणून ही रक्कम बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (दि.६) बोटा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत ४५ हजार रुपयांचा भरणा केला असता साळवेंकडून रोखपालला ५० हजार रुपयांची रक्कम नजरचुकीने गेली. शेतीच्या कामाची गडबड असल्याने शेतकरी साळवे यांच्याकडून पाच हजार रुपये जास्त गेले. परंतु, रविवारी बँकेला सुट्टी असल्याने ते सोमवारी बँकेत गेले असता बँकचे रोखपाल अरुण जोगळेकर यांनी जादा आलेली पाच हजार रुपयांची रक्कम शेतकरी साळवे यांना परत केली. यावेळी बोटा ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यवस्थापक सागर रोकडे, सहाय्यक व्यवस्थापक रमणरंजन साहू, लिपीक आदित्य काळे, बबन शेळके उपस्थित होते.
..
१०घारगाव सत्कार