अहमदनगर : डॉ.अनभुले हॉस्पिटल, स्टार आय.सी.यू. स्पेशालिटी अॅण्ड जनरल केअर युनिटच्यावतीने रविवारी मोफत मधुमेह प्रशिक्षण शिबीर झाले. यावेळी शहरात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. या शिबिर उदघाटन कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ.रावसाहेब अनभुले, डॉ.गोपाल बहरुपी, डॉ.सुधीर बोरकर, डॉ. रणजीत सत्रे, डॉ.भूषण अनभुले, डॉ.दीपाली अनभुले, डॉ.योगीता सत्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये डॉ.संभाजी पानसंबळ, डॉ.शैलेंद्र खंडागळे, डॉ.भाऊदेव जोशी, डॉ.सुमतीलाल संकलेचा, डॉ.उदय महाले, डॉ. विलास सोनवणे, डॉ.एस.जी.खन्ना, डॉ.अजय देशमुख, डॉ.पी.एस.आहुजा, डॉ.प्रदीप काळपुंड, डॉ.विलास कवळे, डॉ.सिमा इकबाल आदींचा समावेश होता.यावेळी पाचपुते म्हणाले, जो संकटाचा सामना करतो तोच यशस्वी होतो. जो दमून जातो तो संपून जातो. आजारापुढे हार न मानता त्याच्याशी सामना करा. काळजी करु नका, तर काळजी घ्या. चिंता करु नका, तर चिंतन करा. मधुमेह टाळण्यासाठी योग्य आहार व व्यायामाची आवश्यकता आहे. आळस झटकून व्यायाम केल्यास आरोग्य उत्तम राहून जीवन आनंदी बनते. डॉ. गोपाळ बहुरुपी म्हणाले, मधुमेह आजार इतर आजारांपेक्षा सर्वात चांगला व सर्वात वाईट आजार आहे. यासाठी त्याची माहिती व जनजागृती होणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. या आजारात डोक्यापासून तर पायाच्या नखा पर्यंत शरीर आतून पोखरले जाते. फास्टफुड, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण यामुंळे मधुमेहांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मधुमेह आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. उत्तम आहार, तणावमुक्त जीवन व नियमित व्यायाम केल्यास मधुमेह रुग्णांना सामान्यांप्रमाणे आनंदी जीवन जगता येते. डॉ.सुधीर बोरकर यांनी योगा, इन्सुलिनविषयी मार्गदर्शन केले. मधुमेह प्रशिक्षण शिबीरास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मधुमेह रुग्णांची मोफत तपासणी करुन, गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शर्मिला गोसावी यांनी केले. उपस्थितांचे आभार संदीप लोखंडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव
By admin | Published: July 26, 2016 12:02 AM