अहमदनगर : शहरातील सावेडीमधील कराळे एज्युकेशन संस्थेच्या कोचिंग क्लासला ‘बेस्ट कोचिंग क्लास’ चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. सोमवारी मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते क्लासेसचे संचालक सुनील व बबन कराळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गरजू विद्यार्थ्यांना अतिशय माफक फीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील दर्जाचे शिक्षण देण्याचे काम कराळे एज्युकेशन देत आहे. दुर्गम, ग्रामीण भागातून आलेले कराळे मॅथ्स ॲकॅडमी अहमदनगरचे संचालक प्रा. सुनील कराळे व
बी. के. फिजिक्स ॲकॅडमीचे संचालक प्रा. बबन कराळे हे दोन भावंडे गेल्या दशकापासून शहरात एज्युकेशन क्लासेस चालवित आहेत.
प्रा. सुनील बी. टेक, तर प्रा. बबन बीई आहेत. नोकरीसारखे क्षेत्र खुणावत असतानाही कराळे यांनी चार विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेला क्लासेसचा हा उपक्रम एक दशकानंतर ॲकॅडमीमध्ये रूपांतरित झाला. दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असतात. ॲकॅडमीमधून पुढे गेलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित संस्थांमधून उच्चशिक्षण घेत आहेत. (वा. प्र.)
----------
फोटो -०२ कराळे ऑकेडम
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कराळे बंधुंचा गौरव करण्यात आला.