जामखेड : येथील डॉ. आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात पहिला लाटेपासून ते दुसऱ्या लाटेत आजपर्यंत तालुका व परिसरातील बाधित रुग्णांची डॉ. रवी व शोभा आरोळे यांनी मोफत सेवा केली. त्यांनी या माध्यमातून आई-वडील यांनी केलेल्या सेवेचा वारसा पुढे चालू ठेवला. या कोरोना सेंटरमधील काम करणाऱ्या सर्वांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा केली. त्यांची उतराई होणे शक्य नाही. मात्र, भाजप युवा मोर्चाने या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केला. यापुढेही या कामासाठी मदतीचा हात देऊ, अशी ग्वाही यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली.
डॉ. आरोळे हॉस्पिटलच्या प्रांगणात भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांचा सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. रवी आरोळे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांची भाषणे झाली. प्रास्ताविक पांडुरंग उबाळे यांनी केले. शरद कार्ले यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिंवसरा, अनिल लोखंडे, रवी सुरवसे, सुधीर राळेभात, तात्याराम पोकळे, लहु शिंदे, मोहन गडदे, माऊली जायभाय, भागवत सुरवसे, दत्ता चिंचकर, सागर सोनवणे, बाजीराव गोपाळघरे, उदयसिंह पवार, धनंजय गावडे, संतोष हजारे, गौतम हजारे, गोरख घनवट, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, विकी घायतडक, आप्पा ढगे आदी उपस्थित होते.
----
२६ जामखेड आरोळे
जामखेड येथे आरोळे हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा भाजपच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.