श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरूर व कर्जत तालुक्यातील ७० गावांना वरदान ठरणाऱ्या घोड धरणात २ हजार ७३५ एमसीएफटी (५० टक्के) पाणी साठा आहे. धरणात सध्या ४ हजार ३०० क्युसेस पाण्याची आवक होत आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे धरण ९० टक्के भरले आहे. धरणात ११ हजार २६८ एमसीएफटीइतका पाणीसाठा आहे. त्यामुळे घोड नदीत २५० क्युसेस तर डाव्या कालव्यात २०० तर उजव्या कालव्यात १५० क्युसेसने पाणी सोडले जात आहे. माणिकडोह धरण ४ हजार ८५३ (४८ टक्के) तर पिंपळगाव जोगे २ हजार ५०४ (६४ टक्के) भरले अहे. येडगाव व वडज धरणे आठ दिवसांपासून ओसंडून वाहत आहेत. पावसाचा वेग मंदावल्याने नदीत सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे.चार टक्के कमी साठाकुकडी प्रकल्पात गेल्या वर्षी ७ आॅगस्टअखेर २३ हजार ६२४ (७७ टक्के)े पाणी साठा होता. यंदा अवघा चार टक्के पाणी साठा कमी आहे.(तालुका प्रतिनिधी)
घोड धरण ५० टक्के भरले
By admin | Published: August 07, 2014 11:54 PM