श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरुर, कर्जत तालुक्यातील सुमारे ७० गावांना वरदान ठरणाऱ्या घोड धरणात सध्या ४ हजार ६३८ एमसीएफटी (८५ टक्के) पाणीसाठा आहे. धरणात ३ हजार क्युसेस पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे घोड धरण येत्या चार ते पाच दिवसात ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.श्रीगोंदा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. कुकडीचे आवर्तन विसापूर तलावाकडे वळविण्यात आले आहे.धरण व पाणीसाठे (आकडे एमसीएफटीमध्ये)- येडगाव- १ हजार ७४९ (६२ टक्के, पाऊस ५४९ मि.मी), माणिकडोह -५ हजार ५७० (५५ टक्के, पाऊस ७९० मि.मी), वडज- १ हजार १४३ (९८ टक्के, पाऊस ५०१ मि.मी.) नदीत २५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले.डिंबे - १२ हजार १७९ (९८ टक्के, पाऊस ७३२ मि.मी.), विसापूर - २११ (२३ टक्के, पाऊस २३६ मि.मी.), सीना व खैरी प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा असून पाऊस सुरु झाल्याने धरणात पाणी पातळी वाढत आहे.काष्टी व वांगदरी परिसरात बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन दिवसात ३५ ते ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (तालुका प्रतिनिधी)
घोड ८५ टक्के भरले
By admin | Published: August 29, 2014 1:04 AM