अहमदनगर : राज्य सरकारने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान बाजार समित्यांमध्ये विकलेल्या कांद्यास प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान जाहीर केले आहे. जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेपर्यंत हे अनुदान मिळणार आहे. यासाठी १५ जानेवारीपर्यंत शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील ४८ हजार ७९९ शेतकºयांनी अनुदान मिळण्यासाठी अर्ज केल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले.कांदा अनुदान मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर ज्या शेतक-यांनी बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेला आहे, अशा शेतक-यांना सरकारने प्रतिक्विंटल २०० रूपयांप्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत कांद्यास अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.अर्जांची छाननी सुरूकृषी उत्पन्न बाजार समित्यांकडील माहितीनुसार मुदतीत २०० क्विंटल मर्यादेत कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांची अंदाजे संख्या १ लाख ६६ हजार ४२७ आहे. १५ जानेवारीपर्यंत ४८ हजार ७९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकास्तरीय समितीने आतापर्यंत ५ हजार ५४९ अर्जांची तपासणी केली असून ५ हजार ५४७ अर्ज पात्र ठरले आहेत. त्याद्वारे ९५ हजार ७७ क्विंटल कांदा बाजार समितीत विकण्यात आला आहे. इतर अर्जांची छाननी सुरू आहे.
कांदा अनुदानासाठी शेतक-यांना अर्ज सादर करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. अनुदानापासून पात्र शेतकरी वंचित राहू, नयेत म्हणून राज्य सरकारने अर्ज सादर करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकºयांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन जवळच्या २बाजार समितीशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत.- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.तालुकानिहाय स्थितीतालुका प्राप्त अर्ज पात्र अर्ज कांदा वजननगर.................... १५६५८......छाननी सुरू................ छाननी सुरूसंगमनेर............... ३२७३....... १९५६..................... ८६९९२अकोले............... १०७......... ३०........................ ४९०पारनेर................ २३८५....... १३७...................... ४९८७श्रीगोंदा.............. १३५......... १३५...................... २२९१कर्जत................ २४२......... छाननी सुरू.............. छाननी सुरूजामखेड............. ६५०......... छाननी सुरू.............. छाननी सुरूपाथर्डी.................. ४८५........ १७........................ ३१७शेवगाव................ ११४८..... ८८....................... छाननी सुरूनेवासा.................. १०४९७..... १८९१.................... छाननी सुरूराहुरी................... ९१२५...... ३४३..................... छाननी सुरूश्रीरामपूर ............. २३८२..... ८५०....................... छाननी सुरूराहाता................ १४५५..... १००........................ छाननी सुरूकोपरगाव ........... १०३८...... छाननी सुरू............... छाननी सुरूप्रसन्न कृषी मार्केट... २१९........ छाननी सुरू.................. छाननी सुरूएकूण................... ४८७९९... ५५४७.................. ९५०७७