अहमदनगर : निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन धारण केले आहे. मात्र, अण्णा हजारे हे सामान्य लोकांचा आवाज आहेत. त्यांनीच महिलांच्या प्रश्नावर मौन धरले तर प्रश्न कसा सुटणार? याच प्रश्नावर अण्णांनी टाहो फोडायला हवा. अण्णांकडे समाज मोठ्या अपेक्षेने बघत आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी मांडले.
केडगाव (ता. अहमदनगर) येथील स्नेहांकुर येथे त्या आल्या होत्या.