अहमदनगर : पाणी फौंडेशनच्या माध्यमातून आणि शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध झालेले जेसीबी, पोकलेन मशिन यांच्या प्रत्यक्ष कामाचे शंभर तास पूर्ण झाल्याने ही मोहीम बुधवारी थंडावली. त्यात मंगळवारी रात्री वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसाने नदीपात्रात चिखल झाला. बुधवारी डंपरची संख्या कमी झाल्याने अधिकारीही हतबल झाले.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे शासकीय यंत्रणा आणि पाणी फौंडेशन यांच्या सहकार्यातून सीना नदी साफसफाई मोहिमेला मशिनरी मिळाली होती. त्यांच्या कामाची मुदत बुधवारी संपली. संबंधितांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कामांचे शंभर तास पूर्ण झाले होते. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेली मुदतही संपुष्टात आली. त्यामुळे नदी पात्रात मशिनरी असुनही बुदवारी जवळपास दिवसभर काम बंदच होते. दरम्यान अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता.मंगळवारी रात्री वादळी वाºयासह पावसाने नगरच्या काही भागाला चांगलेच झोडपले. त्यामुळे नदी पात्रात पावसाचे पाणी साचले होते.