अहमदनगर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळच्या वेळी शेकडो नागरिकांनी घरात बसूनच योग केला. पतंजली योग समिती आणि आॅर्ट आॅफ लिव्हिंगच्या योग शिक्षकांनी सोशल मिडियावरून योगा शिकवला. त्याचा नागरिकांनी आॅनलाईन लाभ घेतला.आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. दरवर्षी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मैदाने, क्रीडांगणावर सामुदायिक पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. मात्र अनेकांनी आज आपल्या परिवारासोबत, घरात आणि घराच्या गच्चीवर स्वतंत्रपणे योगासने केली.जिल्हा पतंजली समितीने एक हजार योग शिक्षकांच्या माध्यमातून आॅनलाईन योगासने केली. त्यामध्ये शेकडो नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.आॅर्ट आॅफ लिव्हिंगचेही आज दिवसभर चार टप्प्यात योगासने केली जाणार आहे. सकाळच्या दोन टप्प्यात आॅनलाईन योग झाला. त्यामध्ये आॅनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेऊन नागरिकांनी घरीच योगासने केली. शिक्षक, विद्यार्थी, महिला, विविध संस्था, संघटनांनी घरात बसूनच योग करण्याबाबत नियोजन केले होते.
शेकडो नागरिकांनी घरात बसूनच केली योगासने, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:25 AM