घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहारे यांच्या हातावर पहिली लस टोचण्यात आली. त्यानंतर संजीवन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जगदीश वाबळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डाॅ. राजेंद्र मालपाणी यांना लस टोचण्यात आली.
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर, डॉ. संदीप कचेरिया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सीमा घोगरे, आरोग्य सहायक विनायक वाडेकर, सतीष बुरूंगुले, कैलास ढगे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी संगमनेर तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी डाॅ. मंगरूळे अध्यक्ष असलेल्या या समितीत एकूण २२ सदस्य आहेत. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभागातील ३ हजार ५०८ जणांना लस टाेचण्यात येणार आहे. यात खासगी वैद्यकीय व्यावसायिक व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. लस विशिष्ट तापमानात ठेवावी लागणार आहे. त्यानुसार योग्य नियोजन करण्यात आले आहे.
...
फोटो नेम :१६ संगमनेर कोरोना लसीकरण
ओळ : संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहारे यांना पहिली कोरोना लस टोचण्यात आली.