पीडित महिला हिचे २००८ मध्ये आरोपीसोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले झाली. आरोपी मात्र त्याच्या पत्नीला शुल्लक कारणांतून वारंवार त्रास देत होता. त्यामुळे पीडिता ही तिच्या पत्नीपासून वेगळे राहत होती. ३ ऑगस्ट २०१७ राेजी सायंकाळी पाच वाजता पीडित महिला ही तिच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मोरे याने तिला अडवून तिच्या डोक्यावर सल्फ्युरिक ॲसिड ओतले. यामुळे पीडितेच्या अंगावर विविध ठिकाणी जखमा होऊन तिला मरणयातना सहन कराव्या लागल्या. यावेळी पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर भिंगार पोलिसांनी तिचा जबाब घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरिकीषक एस.पी. कवडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व समोर आलेल्या साक्षीपुराव्यानुसार न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ॲड. केळगंद्रे यांना पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉस्टेबल मारुती थोरात यांनी सहकार्य केले.
------------------------------------------
विकृत मानसिकतेत सुधारणा व्हावी
महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकारी आहे. त्यांचा हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ॲसिड हल्ल्यामुळे पीडितेचे शारीरिक व मानसिक खच्चीकरण होते. या खटल्यातील पीडितेला खूप यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना रोखल्या जाव्यात व समाजातील विकृत मानसिकतेमध्ये सुधारणा व्हावी. असा युक्तिवाद खटल्यादरम्यान ॲड. केळगंद्रे-शिंदे यांनी न्यायालयात केला होता.