अहमदनगर : पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पावणेदोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला होता.ज्ञानेश्वर बाळू डुकरे (रा. हनुमानवस्ती, अकोला, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. मुलीची आई सरस्वती जायभाये यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल घोडके यांनी काम पाहिले. दि. १ फेब्रुवारी ते ९ सप्टेंबर २०१६ दरम्यान फिर्यादीची मुलगी सावित्रा ही अकोला येथे सासरी नांदत असताना तिचा पती ज्ञानेश्वर डुकरे हा चारित्र्याच्या संशयावरून सावित्राचा मानसिक, शारीरिक छळ करीत असे. त्यातूनच दि. १ सप्टेंबर २०१६ रोजी आरोपी पती ज्ञानेश्वर याने सावित्राचा नाक व तोंड दाबून खून केला.हा खटला येथील जिल्हा न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षाच्या वतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात घाटी हॉस्पिटमधील डॉक्टर गणेश निदूरकर यांची साक्ष महत्वाची ठरली. सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश व्ही. डब्ल्यू. हूड यांनी आरोपी ज्ञानेश्वर डुकरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल घोडके यांना एन. जे. गर्जे यांनी सहाय्य केले.
पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:52 PM
पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पावणेदोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला होता.
ठळक मुद्देपाथर्डी तालुक्यातील घटना : जिल्हा न्यायालयाचा निकाल