शिर्डी ( जि. अहमदनगर): शिर्डी लोकसभा मतदान संघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. याबाबत भाजपाचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. तांत्रिक अडचन आहे मात्र, भाजपाच्या वाट्याला शिर्डीची जागा गेल्यास आपण शिर्डीतून निवडनुक लढवण्याबाबत भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले.
शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले की, देशात आणि राज्यात मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए मोठे यश मिळणार आहे. मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला आहे मात्र, कॉंग्रेसने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष केला. संविधनाच्या नावावर कॉंग्रेस चुकीचा आरोप सरकारवर करत आहे. संविधनाबाबतच्या कॉंग्रेसने भाजपावर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उलट कॉंग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबकरांचा वारवांर केलेला अपमान दलित समाज कदापीही विसरणार नयल्याचे आठवले यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही. तरी प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लोकसभा निवडनुकीसाठी १२- १२-१२ जागांचा फ़ॉर्मूला आघाडीसमोर ठेवला आहे. त्याचा महाविकास आघाडीने विचार केला पाहीजे. उध्दव ठाकरे यांना भाजपामधील नेत्यांच्या घराणेशाहीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिल्याचे त्यांच्या स्मरणात राहीलेले नाही. एकनाथ शिंदे आमदारांसमवेत भाजपासोबत आले, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत यायला हवे होते. भविष्यात ठाकरेंची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राजकीय सोयरीक टीकणार नाही. त्यांनी जर भाजपासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए चारशे जागांचा आकडा पार करेल असा विश्वास आठवले यानी व्यक्त केला.
राज्यातील दलित जनता आमच्यासोबत असल्याने वंचीतचा फटका महायुतीला अजिबात बसणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला दोन जागा एनडीएकडून मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न आहे . लालकृष्ण आडवानी यांना भारतरत्न देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. भविष्यात अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधान मोदींशी आपण चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.