शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 7:00 PM

आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़. लवकरच आपण मला त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़.

शिर्डी : आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़ लवकरच आपण आत्मचरित्र लिहिणार असून त्यात त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़.खडसे यांनी बुधवारी सहकुटूंब साईदरबारी हजेरी लावली़. यावेळी संस्थानचे सीईओ दीपक मुगळीकर यांनी त्यांचा सत्कार केला़. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, माजी विश्वस्त सचिन तांबे आदींची उपस्थित होते़. खडसे पुढे म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला निवडून दिले आहे़. दोन्ही पक्षातील तणाव काही दिवसात मिटेल. शेवटच्या क्षणाला महायुतीचेच सरकार येईल. राज्यात स्थीर व महायुतीचे सरकार यावे यासाठी यासाठी प्रार्थना केली आहे. युती करताना दोन्ही पक्षाचे काय ठरले ते माहीत नाही़. मुख्यमंत्री ठरविण्याएवढा मी मोठा नाही़. त्यामुळे माझ्यासारख्याला त्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही़. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे घोषित केले आहे़. त्यावर पक्षाध्यक्ष अमीत शहा यांनीही शिक्कामोर्तब केले आहे़. त्यामुळे आमच्या नजरेसमोर भाजपा व महायुतीचा नेता म्हणून फडणवीसच आहेत़.शिवसेना आक्रमक असताना भाजप शांत आहे. याचा अर्थ तो बॅकफुटवर आहे असा नाही़. पक्षाचा तो स्वभाव आहे़. तणाव न वाढवता मार्ग निघेल़. महायुती टिकविण्याच्या दृष्टीने भाजपाने भुमिका स्वीकारलेली दिसते़. तणाव संपून संवाद वाढावा व एकत्रिकरण व्हावे, त्या माध्यमातून चांगला निर्णय व्हावा अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली़. संघाने भाजपाला कधी आदेश दिल्याचे आठवत नाही. आजवर संघाने योग्य ते मार्गदर्शन केल आहे़. संघाने आताही सल्ला दिला असेल त्यांना तो अधिकार आहे.